जालना- शहर म्हटलं की अतिक्रमण हे आलेच !त्यात नवीन काही नाही, नियमापेक्षा बांधकामही जास्त होते. त्यातही नवीन काही नाही परंतु एखाद्या नदीपात्रात जर बारा मीटर रुंदीचा रस्ता होत असेल तर तो निश्चितच संतापाचा विषय होतो. हाच विषय सध्या जालना शहरात सुरू आहे.
जालना शहरातून वाहत असलेल्या कुंडलिका आणि सीना या दोन नद्यांच्या पुनर्जीवनाचा आणि स्वच्छतेचा उपक्रम शहरातील सामाजिक संस्था उद्योजक आणि नागरिक एकत्र येऊन करत आहेत. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी देखील जमा होत आहे. हा उपक्रम होत असतानाच नवीन जालन्यामध्ये गोल्डन जुबली शाळेच्या बाजूला सीना नदीपात्रामध्ये बारा मीटर रुंद आणि सुमारे एक किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी किमान आठ ते पंधरा दिवस तरी लागले असावेत. परंतु अद्याप पर्यंत या रस्ता संदर्भात महानगरपालिकेकडे कुठलीही नोंद नाही .कोण करतय? याचीही माहिती नाही. कशासाठी करते हे देखील माहित नाही. त्यामुळे संतापलेल्या जालनेकारांनी आज थेट हे नदीपात्र गाठले आणि परिसरातील स्वच्छता करून महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनाही बोलावले. खरंतर गेल्या आठ दिवसांपासून या रस्त्यासंदर्भात शहरात चर्चा सुरू झाली होती आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दोष दिल्या जात होते. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वतः आज या रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता महानगरपालिकेच्या वतीने केल्या जात नाही असा स्पष्ट खुलासा केला. याची सर्व माहिती घेऊन चौकशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान या संदर्भात सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देखील निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हा रस्ता कोणी केला हे जरी भविष्यात उजेडात नाही आले तरी रस्त्याचे काम थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता. -दिलीप पोहनेरकर-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com