जालना -9 ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या निमित्ताने महात्मा गांधींनी इंग्रजांसाठी चले जावचा नारा दिला होता. आज आम्ही मोदी चले जावचा नारा देत आहोत ,आणि तशी प्रतिज्ञा केली आहे. अशी माहिती जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. जुन्या जालन्यातील गांधीचमन येथे मशाल पेटून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेेेच ही फेरी मस्तगड येथील हुतात्मा् स्मारका जवळ गेल्यानंतर तिथे या फेरीचा समारोप झाला .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख ,शेख मेहमूद ,युवा नेते अक्षय गोरंट्याल, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती विमल आगलावे, आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार गोरंट्याल म्हणाले की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन. महात्मा गांधींनी इंग्रजां साठी चले जावचा नारा दिला होता, तोच नारा आज आम्ही भाजपचे सरकार असलेल्या केंद्र शासनातील नरेंद्र मोदी यांच्यासाठी देत आहोत. याच सोबत खेलरत्न पुरस्कारासाठी राजीव गांधी यांचे नाव होते ते काढून घेऊन मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले आहे. सूडबुद्धीने हे नाव वगळलेले आहे .त्यामुळे आता मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने एकजूट घट्ट केले आहे. एवढेच नव्हे तर मोदी चले जाव साठी प्रतिज्ञा् केली असल्याची माहिती देखील आमदार गोरंट्याल यांनी दिली .
*ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app,9422219172*