Advertisment
Breaking NewsJalna Districtजालना जिल्हाराज्य

नैसर्गिक आपत्तीचे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान लाटण्यात अंबड तालुका अव्वल!

जालना – शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचे बोगस अनुदान लाटण्यामध्ये अंबड तालुका अव्वल आला असून त्या पाठोपाठ घनसावंगी तालुक्याचा क्रमांक लागत आहे . बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्र्यांना दिनांक 16 मार्च 25 रोजी जालना जिल्ह्यामध्ये तहसीलदार यांचे लॉगिन आयडी वापरून ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शेती नसतानाही गावातील व्यक्तींशी संगणमत करून बोगस लोकांना पैसे देणे, इतर गावातील शेती असलेल्या लोकांना हाताशी धरणे ,कोरडवाहू शेती बागायती दाखवणे, कमी शेती असताना जास्त दाखवणे ,बोगस व्यक्तींच्या नावावर अनुदान लाटणे, दुबार अनुदान लाटणे, अशा प्रकारची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्रिसदस्य समिती स्थापन केली होती आणि या समितीने अंतरिम अहवाल सादर केलेला आहे .या अहवालामध्ये एकाच खातेदाराच्या खात्यात दुबार अनुदान जाणे, बोगस खातेदारांचे नावे अनुदान दिले जाणे, मूळ खातेदाराच्या ठिकाणी दुसऱ्या खातेदाराचे नावावर अनुदान दिले जाणे, गावात सर्वे क्रमांक उपलब्ध नसताना सदर सर्वे क्रमांकावर बोगस खातेदारांचे नावाने अनुदान देणे, सरकारी जमिनीवर/ गटावर बोगस खातेदारांच्या नावाने अनुदान देणे आणि खातेदारांच्या नावे अतिरिक्त क्षेत्र दाखवून वाढीव क्षेत्राचे अनुदान देणे या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली.

या चौकशीमध्ये अंबड तालुक्यात शेती नसलेले लाभार्थी 1342 निष्पन्न झाले. त्यांनी 31 कोटी 84 लाख 89 हजार 417 रुपये लाभ उचलला. असाच लाभ घनसावंगी मध्ये 4656 शेतकऱ्यांनी नऊ कोटी 87 लाख 7877 रुपयांचा घेतलेला आहे *दुबार अनुदान वाटपामध्ये अंबड तालुक्यात 2113 लाभार्थ्यांनी तीन कोटी 92 लाख 44 हजार 74 रुपये तर घनसांवगी तालुक्यात 336 शेतकऱ्यांनी चार कोटी 80 लाख 25 हजार 747 शेतकऱ्यांनी या लाभाचा गैरफायदा घेतला आहे.* क्षेत्र वाढ करून अनुदान वाटप लाटणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये अंबड तालुक्यात 2884 शेतकरी आहेत, त्यांनी पाच कोटी 69 लाख 63 हजार 175 हजार रुपये लाटले आहेत आणि घनसावंगी तालुक्यात 175 शेतकऱ्यांनी दोन कोटी 81 लाख 48 हजार 20 रुपये बोगस अनुदान हडपले आहे.* शासकीय जमिनीवर अनुदान लाटणाऱ्यांची संख्या अंबड तालुक्यात 22 एवढी आहे त्यांनी सहा लाख 73 हजार 760 रुपये तर घनसांवगी मधील 17 शेतकऱ्यांनी चार लाख 72204 रुपये लाटले आहेत.* अशा प्रकारे अंबड तालुक्यामध्ये एकूण 18461 शेतकऱ्यांनी 41 कोटी 53 लाख 70 हजार 426 रुपये तर घनसावंगी मध्ये 8184 शेतकऱ्यांनी 14 कोटी 99 लाख 55 हजार 648 रुपये ,अशा दोन्ही तालुक्यातील 26645 शेतकऱ्यांनी शासनाच्या 56 कोटी 53 लाख 26 हजार 74 रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारला आहे. या अनुदानामध्ये जिरायत जमिनीला बागायत किंवा फळबागाचे क्षेत्र दाखवून अनुदान हडप केलेल्या ची आकडेवारी नाही. त्यामुळे यामध्ये अजून वाढ होण्याची ही शक्यता आहे

लबाड लाभार्थ्यांकडून अनुदान वसूल जालना जिल्ह्यासाठी दोन लाख 81 हजार 532 लाभार्थ्यांसाठी 488 कोटी 34 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून काळजीही घेतल्या जात आहे .दरम्यान आत्तापर्यंत लाटलेल्या बोगस अनुदानापैकी 851 लाभार्थ्यांकडून एक कोटी सहा लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती जाणण्याची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. तसेच यापुढे वाटप होणाऱ्या अनुदानामध्ये गैरसोय होऊ नये म्हणून पाच सदस्य अभ्यास गट समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी ,जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button