जालना- थालेसेमिया(Thalassemla) हा गंभीर आजार आहे, या गंभीर आजारामुळे शरीरातील लाल रक्त पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे हिमोग्लोबिन कमी होते त्यामुळे हा आजार असलेल्या रुग्णाला वारंवार रक्त बदलावे लागते. हा अनुवंशिक आजार आहे त्यामुळे, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. या संदर्भात ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने या आजाराच्या रुग्णांसाठीरविवारी एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दहा वर्षांपासून थॅलेसेमियाच्या रुग्णांवर मोफत उपचार केल्या जातात. आत्तापर्यंत 140 रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केल्यानंतर दुपारी या मेळाव्याला सुरुवात झाली.
दुसऱ्या सत्रामध्ये या शिबिरात संभाजीनगर येथील डॉ. निकेत मंत्री यांनी या आजारासंदर्भातची लक्षणे त्यावरील उपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती घनश्यामशेठ गोयल, डॉ. ओंकारदास अग्रवाल ,जनकल्याण रक्त केंद्राचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोनी, सचिव भगवानराव सांगोळे, उपाध्यक्ष डॉ. सतीश मुंदडा, डॉ सौ. शुभांगी मिसाळ नम्रता पित्ती, डॉ. नीरु रितेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ. अनिकेत मंत्री म्हणाले की, “हा आजार अनुवंशिक असल्यामुळे लग्नापूर्वी आपण ज्या पद्धतीने कुंडली पाहतो त्याचप्रमाणे ही आरोग्य कुंडली नववधू-वरांनी तपासणी गरजेचे आहे. कदाचित यावेळी हे झाले नसेल तर महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यातच ही तपासणी करून घेतली पाहिजे. भविष्यामध्ये होणारा धोका वेळीच टाळला तर अनेक संकटे टाळता येतील. या आजाराच्या रुग्णाला दर महिना- पंधरा दिवसाला शरीरातील पूर्ण रक्त बदलावे लागते. म्हणजेच जुने रक्त काढून टाकून त्याच्या शरीरातील पेशी माराव्या लागतात आणि परत नवीन रक्त द्यावे लागते .अशावेळी नवीन रक्तातील पेशी शरीराशी सुसंगत होण्यासाठी कधी- कधी वेळही लागतो त्यामुळे रुग्णाला नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासोबत ओम हॉस्पिटलमध्ये उपचार जरी मोफत होत असले तरी इतर अनेक खर्चाला त्याला सामोरे जावे लागते .त्यामुळे हा आजार होण्यापूर्वीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान यावेळी डॉ. ओम अग्रवाल यांनी थॅलेसेमीया या रुग्णांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देखील या समितीकडे दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गोयल यांनी केले तर आभार पुसाराम मुंदडा यांनी मानले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172