9 महिन्याच्या बालिकेचे तीन मिनिट हृदय; बंद डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून पुन्हा केले सुरु
जालना-अंबड येथून जालन्याला येत असलेल्या 9 महिन्याच्या चिमुकलीला रस्त्यातच मेंदूज्वराचे तीव्र झटके सुरू झाले व तिचे हृदय हॉस्पिटकडे येत असताना हॉस्पिटल जवळच बंद पडले .
दरम्यान या बालकाला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर ही बाब डॉ मिरकड यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखत त्या बाळाला अतिदक्षता विभागात घेऊन (सीपीआर )छाती दाबुन हृदय चालू करणे ही जिकरीची उपचार प्रक्रिया चालू केली व घशात नळी टाकून कृत्रिम श्वास दिला, जवळपास तीस मिनिटानंतर हृदयाचे ठोके सुरळीत होताच तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांचे हे शर्तचे प्रयत्न रुग्णाचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन बघत होते व त्यांची सर्व आशा डॉक्टरांवर अवलंबून होती. नंतरच्या सलग सात दिवसाच्या अतिदक्षता विभागातील अथक प्रयत्नानंतर चिमुकलीची शारीरिक स्थिती पूर्वपदावर आली व दहा दिवसाच्या उपचारानंतर तिला शुक्रवारी हॉस्पिटल मधून सुट्टी करण्यात आली. या उपचारांमध्ये संजीवनी हॉस्पिटल चे बाल रोग तज्ञ डॉ. शिवदास मिरकड, डॉ. कैलाश राजगुरू डॉ. श्याम बागल तसेच बाल अतिदक्षता विभागातील कर्मचारी यांनी मेहनत घेतली. हा इलाज हॉस्पिटलने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला.कृतज्ञतेचा भाग म्हणून चिमुकलीचे नातेवाईक वडील शेख अजहर शेख, माजी नगरसेवक जाकीर भाई डावरगावकर , रशिद अली भाई, सय्यद सुलतान उर्फ भाईजान, शेख तारीख भाई डावरगावकर, लतीफ शेख सय्यद यांनी डॉक्टरांचे व हॉस्पिटलचे आभार मानले व डॉक्टरांचा सत्कार केला. या कौतुकामुळे डॉक्टरांना अधिक काम करण्यास प्रेरणा मिळते असे मनोगत संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. बळीराम बागल यांनी व्यक्त केले.
-www. edtv jalna. com
दिलीप पोहनेरकर,9422119172