Advertisment
Jalna District

न्यायाधीशांच्या घरीच चोरी :पळवला चांदीचा आकडा

जालना -चोरट्यांची हिम्मत एवढी आता वाढली आहे की न्यायाधीशांच्या घरी चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशीच घटना काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. परतुर येथील महिला दिवाणी न्यायाधीश यांचे तहसील कार्यालयाच्या बाजूलाच निवासस्थान आहे. या निवासस्थानातून संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चांदीचा आकडा चोरट्याने चोरून नेला. सुमारे दीड हजार रुपयांचा हा आकडा आहे.

याप्रकरणी दिवाणी न्यायाधीशांचे सहकारी अंकुश रामराव इटकर यांनी न्यायालयातील शिपाई नितीन प्रकाश इंगळे यांना ही माहिती दिली. त्यानुसार नितीन इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button