Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

बंद पथदिव्यांमध्येही मंमादेवी चा 12 गाड्यांचा उत्सव जोरात

जालना- शहराचे आराध्य दैवत असलेल्या मंमादेवी च्या 12 गाड्यांचा उत्सव रात्री पार पडला. विशेष म्हणजे पथदिव्यांचा अंधार असतानाही हा उत्सवआनंदात आणि निर्विघ्न पार पडला.

कुंडलिका नदीच्या काठावर मंमादेवीचे मंदिर आहे. पूर्णपणे काचांमध्ये सजविलेले हे मंदिर आणि त्यावर केलेली विद्युत रोषणाई ही भाविकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. नवसाला पावणारी देवी म्हणूनही या देवीची ख्याती आहे . नवसाला पावल्यानंतर नवस फेडण्यासाठी “गळकरी” या बारा गाड्या ओढतात.

ज्या भाविकासाठी हा नवस केला आहे त्या भाविकाच्या हाताने सकाळी देवीला पाणी घालून अभिषेक केला जातो ,आणि त्यानंतर सायंकाळी गाड्या ओढण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्यामध्ये शाकाहार आणि मांसाहार असे दोन्ही नैवेद्य देवीला चालतात. नैवेद्य झाल्यानंतर गळकरी (ज्याच्या कमरेला दोरी असते आणि त्या दोरीला गाडी ओढण्यासाठी एक गळ अडकवला जातो त्याला गडकरी असे म्हणतात) बारा गाड्यांकडे जातो आणि या बारा गाड्यांना वाजत-गाजत पाच प्रदक्षिणा घालतो. याच वेळी मानाची पाच श्रीफळ संस्थांच्या विश्वस्तांकडे दिल्यानंतर त्यापैकी एक श्रीफळ कडून बारा गाड्या ओढण्यासाठी चा गळ या गळकऱ्यांच्या कमरेला अडकवला जातो. आणि काय नवस केला होता तो विचारला जातो. आणि तो उघडपणे सांगावा लागतो.

 काल 109 भाविकांनी देवीला कबूल केलेले नवस पूर्ण झाल्यामुळे गाड्या किती वर्षे ओढणार तेही सांगितले आहे .त्यामुळे या 109 भाविकांच्या भाविकांनी केलेल्या नवसाला मंमादेवी पावली म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

रेल्वे स्थानकापासून मंमादेवी मंदिरापर्यंत या गाड्या ओढल्या जातात. एक बाजू अशी आहे की हा रस्ता नुकताच सिमेंट कॉंक्रिट झाला आहे, परंतु या रस्त्यावर असलेले पथदिवे काल एवढ्या उत्सवासाठी देखील बंद होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही ,मात्र अशा सणाच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याला आणि मंमादेवी मंदिराला जत्रेचे स्वरूप आले होते.ठीक- ठिकाणी भाविकांसाठी फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
या बारा गाड्या ओढण्याचे मानकरी म्हणून मंमादेवी संस्थानचे विश्वस्थ कैलास राधाकिसन परदेशी हे काम पाहत आहेत.

बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button