झेडपी चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल चालले;वर्षा मीना येणार!
जालना- जालना जिल्हा परिषदेला सुमारे वर्षभरापूर्वी मुख्य कार्यकारी म्हणून बदलून आलेले मनूज जिंदल यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नाशिक येथील सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना येत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ राजगोपाल देवरा यांनी हे आदेश काल निर्मित केले. नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती वर्षा मीना या सन 2018 च्या तुकडीतील भारत प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत जालन्यात येत आहेत .जालना जिल्हा परिषदेतील प्रस्थापित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मनूज जिंदल यांच्या पूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम केले. लोकप्रतिनिधींना न जुमानता सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले .त्यामुळे अनेक वेळा त्यांना विरोधी पत्करावा लागला आहे. दरम्यान त्यांच्या काळात अनेक चौकश्या झाल्या आणि त्या संदर्भातील आदेशही त्यांनी जाहीर केले आहेत. मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते सर्व आदेश लाल फीतीत बंद करून ठेवले आहेत, ज्यांची भनक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जिंदल यांना देखील नाही. मात्र असे असतानाही आपल्या आप्त स्वकीयांच्या हितासाठी अधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनूज जिंदल यांची अनेक वेळा दिशाभूल केली. त्याचा परिणाम म्हणून घेतलेले निर्णय नंतर मागे घ्यावे लागले. आजही श्रीमती अरोरा यांनी दिलेले अनेक आदेश कपड्याच्या गठ्ठ्यात बांधून आहेत. या आदेशांची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहण्याचे आव्हान बदलून येणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासमोर असणार आहे.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com