मिनी मंत्रालयात आले दोन नवीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जालना -जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेमध्ये मंगळवार दिनांक 3 रोजी दोन नवीन अधिकारी रुजू झाले आहेत त्यामध्ये राजेंद्र तुबाकले हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आणि अंकुश चव्हाण हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत या दोन्ही पदावर रुजू झाले आहेत .विशेष म्हणजे हे दोघेही परभणी जिल्हा परिषदेतून जालना जिल्हा परिषदेत बदलून आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून यापैकी एक पद रिक्त असल्यामुळे जालना जिल्हा परिषदेमध्ये अनेक कामे कामे खोळंबलेली होती. एका पदाचा पदभार महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांच्याकडे होता. एकंदरीतच अतिरिक्त कामाच्या व्यापामुळे अनेक कामे देखील खोळंबली होती .हे दोन अधिकारी आता रुजू झाल्यामुळे कामाला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172