विहिरीच्या पाण्यावरून आजोबा आणि काका काकूंनी केला खून
घनसावंगी -शेतातील विहिरीवर पाणी भरण्याच्या वादातून आजोबा आणि काका काकूनेच खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यात देवगाव तांडा येथे घडली.
देवगाव तांडा येथे नामदेव पवार प्रल्हाद, नामदेव पवार, रुक्मीनबाई प्रल्हाद पवार हे आणि या प्रकरणातील खून झालेला तरुण सुनील पवार हे नातेवाईक आहेत. यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून दिनांक 3 रोजी त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. त्यावेळी नामदेव पवार प्रल्हाद नामदेव पवार यांनी सुनील पवार याला चाकूने भोसकले. या प्रकरणातील आरोपी नामदेव पवार यांनी सुनीलला धरले आणि प्रल्हाद पवार यांनी सुनीलच्या पोटामध्ये चाकूने वार केले. त्याचवेळी सुनील पवार याचा मृत्यू झाला. दरम्यान सुनील पवार ची पत्नी यशोदा सुनील पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये भादवी 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणातील नामदेव पवार आणि रुक्मिणी पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर मुख्य आरोपी प्रल्हाद पवार हा फरार असून त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.
ताज्या बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172