जि.प.च्या 109 HM ची सोमवारी पदभरती; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन घोषणाबाजी
जालना -शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत आणि दोन्ही शिक्षण विभागातील शिक्षकांच्या समस्या समोर यायला लागल्या आहेत. त्यातच शिक्षणाधिकारी भेटत नसल्यामुळे संतप्त शिक्षक संघटना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाडा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे या भेटत नसल्यामुळे तसेच कार्यालयात इतर कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे रिकाम्या खुर्चीलाच निवेदन दिले आहे. तर काही प्राथमिक शिक्षकांनी श्रीमती मीना यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हा चेंडू प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखील यांच्याकडेच सोपविला. श्री .दातखिळ यांनी या शिक्षकांची समजूत काढत तूर्तास तरी या शिक्षकांना वाटी लावले आहे. दरम्यान शिक्षकांच्या इतर समस्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सकारात्मक भूमिका घेत पवित्र पोर्टल वरून आलेल्या 263 आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 40 शिक्षकांना पदस्थापना देण्यास सुरुवात केली आहे. पवित्र पोर्टल वरून आलेले शिक्षक हे तरुण असल्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या दुर्गम भागात नियुक्ती देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापकांची 109 पदे रिक्त आहेत ही पदे देखील सोमवारी भरल्या जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जालना कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन करण्यात आले.मागील बऱ्याच दिवसापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तक्रार निवारण बैठक आयोजित करणे बाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती.परंतू संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आचार संहितेचे कारण देऊन वेळकाढू पणा केलेला आहे. संघटनामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे धरणे आंदोलन करून प्रशासनास जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील दोन शिक्षक आपल्या न्याय हक्क मागणीसाठी जि.प.समोर आमरण उपोषण सूरू केले असून या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये श्री.प्रदीप विश्वनाथ राठोड म.स्था. जैन विद्यालय जालना यांची विनाअनुदानित वरून अनुदानित बदली आदेश मागील सहा महिन्यापासून शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे.परिणामी वेतनाअभावी संबधित शिक्षकाची उपासमार होत आहे.तसेच दुसरे उपोषणार्थी श्री.बाळासाहेब देविदास लहाने (स.शि.)श्री विनायक विद्यालय चांदई एक्को ता.भोकरदन हे अतिरिक्त झाले असून संबंधिताचे वेतन सदरील शाळेने थांबविले असल्यामुळे संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे. तसेच भगवान पालकर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे. दत्ता देशमुख यांची सेवा जेष्ठता सुनावणी दोन वेळेस जाणीवपूर्वक प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षणाधिकारी यांना पत्र व्यवहार करण्यात येत असून संबंधित याबाबत कोणतेही योग्य कार्यवाही करीत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यासह जिल्हाध्यक्ष श्री. रमेश आंधळे सचिव संजय येळवंते केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष श्री. वरवटे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी,प्रा.मारुती तेगमपुरे,जगनराव वाघमोडे,प्रद्युम्न काकड, हाकीम पटेल,दिपक शेरे,नारायण मुंढे, जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172