Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

भाग 3- संस्था संचालकांच्या दुर्लक्षामुळे शिक्षकच बनले शिक्षकांचे वैरी

जालना- श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयात (माध्यमिक व उच्च माध्यमिक)  शिक्षकांची मोठी भांडणे सुरू आहेत. संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच अशा प्रकारची भांडणे सुरू असतात. शिक्षकांची सेवा जेष्ठता, त्यांची गुणवत्ता, त्यांच्या कामाचे मूल्यमापन न करता संस्थाचालक निर्णय घेत असल्यामुळे शिक्षकांमध्येच भांडणे सुरू असतात असे शिक्षकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीच याच शाळेतील पंधरा शिक्षक सुमारे एक महिना संपावर गेले होते, आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला होता .त्याच काळातील काही अंशी हे भांडण आहे.

याच शाळेतील शिक्षक प्रदीप विश्वनाथ राठोड हे 7 जून रोजी जिल्हा परिषदेसमोर वैयक्तिक मान्यता मिळावी या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. या प्रकरणांमध्ये न्यायालयात देखील तडजोड करण्यात आली होती परंतु शासन निर्णयात बसत नसल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या तडजोडीचा चेंडू औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला होता. कदाचित संस्थाचालक आणि शिक्षक प्रदीप राठोड यांच्यामध्ये तडजोड झाल्यामुळे हा प्रश्न सुटलाही असता, आणि त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 12 जुलै 2007 रोजी दिलेल्या निर्णयानुसार परिच्छेद क्रमांक तीन मध्ये म्हटले आहे की, संस्थेमधील रिक्त जागा लक्षात घेऊन याचिका कर्त्याला अनुदानित विभागात स्थानांतरित केले आहे. ज्याच्या अटी त्यांनी पूर्ण केल्या आहेत .ही तडजोड नक्की झाली आहे . परिच्छेद क्रमांक चार मध्ये याचिकाकर्त्याने श्री वर्धमान स्थानकवासी जैन महाविद्यालयाच्या सचिवांचे आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचे नियम पाळण्याचे वचन दिलेले आहे. आणि तिसरा परिच्छेद हा फार महत्त्वाचा आहे ज्यामध्ये प्रदीप विश्वनाथ राठोड यांच्या विरोधात याच शाळेतील तक्रार केलेले शिक्षक कृष्णा सोमनाथ तांबे, अर्जुन सुरेश पिसोरे, सोपान प्रभाकर घोलप यांनी न्यायालयामध्ये शिक्षक आणि संस्थेच्या अशा तडजोडीवर त्यांचा आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. आणि या सर्व याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्या निर्णयाच्या अधीन राहून तडजोडीअंती वकिलाने केलेली विनंती मान्य करून याचिका निकाली काढली आहे.

ज्या शिक्षकांनी प्रदीप राठोड यांच्या विरोधात तक्रारी केल्या त्याच शिक्षकांनी बाहेरच्या व्यक्तींना हाताशी धरून तक्रारी करायला लावल्या .त्या शिक्षकांनी न्यायालयात आपला कोणताही आक्षेप नाही असेच सांगितले असताना पुन्हा दिनांक 10 जून 2024 रोजी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिक्षक प्रदीप राठोड यांची विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर केलेली चुकीची बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे. या सर्व गोंधळाला मागील दोन वर्षांमध्ये संस्थाचालकांनी वेळोवेळी बदललेले निर्णय आणि कुठलीही खातरजमा न करता शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्रदीप राठोड याच्या नियुक्ती संदर्भात दिलेले आदेश या सर्व प्रकरणाला कारणीभूत ठरत आहेत. दरम्यान सात जूनला प्रदीप राठोड हे जिल्हा परिषदेसमोर वैयक्तिक मान्यता मिळावी या मागणीसाठी उपोषणाला बसले होते परंतु त्यावेळी देखील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेच्या मागील पत्रव्यवहाराचा संदर्भात  उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकेत आणि शिक्षक प्रदीप राठोड यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवर या कार्यालयाने सुनावणी निर्णय व अनुशासनाप्रमाणे झालेली कारवाई आणि सद्यस्थितीत विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर बदली करणे बाबतच्या प्रचलित नियमानुसार एक महिन्याच्या आत सकारात्मक भूमिका घेतल्या जाईल ,असे पत्र उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांना दिले आणि हे उपोषण सोडवून घेतले. त्यामुळे आता पुन्हा काय आदेश निघतात याची प्रतीक्षा संस्थाचालक ,मुख्याध्यापक ,तक्रारदार शिक्षक आणि उपोषण करते प्रदीप राठोड यांना आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button