जाहिरातींवर प्रकाशकासोबत मुद्रकाचेही नाव आवश्यक अन्यथा होणार कारवाई-मनपा आयुक्त
जालना -शहराच्या सुशोभीकरणापेक्षा विद्रूपीकरणातच जाहिरातीचा मोठा वाटा आहे, त्यामुळे अशा जाहिराती प्रसिद्ध करत असताना महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या जाहिरातीच्या ठिकाणीच त्या प्रसिद्ध कराव्यात आणि त्यावर ज्या मुद्रकाने ही जाहिरात तयार करून दिली आहे मग ती पोम्प्लेट असो अथवा बॅनर त्याच्यावर मुद्रकाचा संदर्भ आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात काही अडचण आली तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करता येईल आणि त्यासोबत ही जाहिरात प्रकाशित करणारा देखील तेवढाच जबाबदार असेल .त्यामुळे या दोघांनीही मुद्रक प्रकाशकाचे विवरण देणे गरजेचे आहे अशा सूचना जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिल्या.
मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये शहरातील मुद्रक आणि प्रकाशक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये शहरात विविध ठिकाणी भिंतीवर पोस्टर्स, चिकटवले जातात परंतु त्यावर मुद्रकाचे नाव नसते आणि अशातून अनेक दुर्घटना आणि वादविवाद वाढतात. याला आळा घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे आणि मुद्रकांनी अशा प्रकारचे वादग्रस्त साहित्य छापण्यापूर्वी विचार करावा. यातून काही वाद वाढला तर मुद्रक जबाबदार असला तर याला आळा बसेल, म्हणून मुद्रकाचे विवरण आवश्यक आहे परंतु अनेक मार्गाने हे विवरण टाकण्यात टाळाटाळ केल्या जाते अशा परिस्थितीमध्ये देखील महानगरपालिका अशा बॅनरच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून त्याचा पुढील तपास पोलीस करून मुद्रकावर कारवाई होऊ शकते असेही आयुक्तांनी सांगितले. एखाद्या होर्डिंग वर जर बॅनर लावायचे असेल तर ते मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच लावावे आणि त्यावर देखील मुद्रकाचे विवरण आवश्यक आहे त्याशिवाय प्रकाशकाने असे बॅनर लावू नये, असेही आयुक्तांनी सांगितले.
या बैठकीला मनपा अधिकारी राहुल देशमुख यांच्यासह प्रकाशक हेमंत ठक्कर, महेश जोशी, चंद्रकांत कुलकर्णी, विशाल जोगदंड ,अल्केश देविदास, विजय राठी, आदी मुद्रक प्रकाशकांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172