पालखीतील वारकऱ्यांची लॉयन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्याचे वाटप
जालना -शेगावच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथील आषाढी वारी करून विठुरायाचे दर्शन घेऊन दिनांक 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासात निघाली आहे. ती जालन्यात काल दिनांक दोन रोजी जे.इ.एस. कॉलेजमध्ये मुक्कामाला होती.
पालखी आल्यानंतर लॉयन्स क्लब ऑफ जालन्याच्या वतीने या पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली .गरजूंना लगेच चष्म्याचे ही मोफत वाटप करण्यात आले ,तर ज्या वारकऱ्यांना डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा वारकऱ्यांना लायन्स क्लबचे कार्ड देऊन ते राहत असलेल्या गावाजवळीलच हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे.
या मोफत तपासणीच्या आयोजनामध्ये श्रीनिवास भक्कड, जगदीश मिश्रा, पुरुषोत्तम बगडिया ,महेंद्र गुप्ता ,प्राचार्य गणेश अग्निहोत्री, पुरुषोत्तम जयपुरिया, यांच्यासह महिला पदाधिकारी अध्यक्ष जयश्री लढ्ढा, कल्पना बियाणी, मंजु श्रीमाळी आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172