Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कुंडलिकाला पुन्हा देणार “रामतीर्थाचे” स्थान

जालना – नवीन आणि जुना जालना असे दोन विभाग असणाऱ्या जालना शहरातून कुंडलिका नदी वाहते. या कुंडलिका नदीच्या काठावरून प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांनी प्रवास केल्याचे आख्यायिकेत आजही पाहायला मिळते. त्यामुळे आज दुरावस्था झालेल्या कुंडलिका नदीला पुन्हा राम तीर्थाचे स्थान मिळवून देण्यासाठी  संस्था सरसावल्या आहेत.

niramy

nrg

त्यासोबत प्रवासादरम्यान प्रभू श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांच श्राद्धही त्यांनी येथे केल्याची नोंद आहे. प्रवासादरम्यान कुंडलिका नदी काठाच्या काठाने जात असताना त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यामुळेच आज या कुंडलिका नदीच्या काठाला रामतीर्थ असे नावही देण्यात आले आहे. त्यासोबत याच नावाने हिंदू स्मशानभूमी देखील इथे आहे. परंतु सध्य परिस्थितीत कुंडलिका नदीचे दोन्ही काठ अतिक्रमण , घाण आणि कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत. हे स्वच्छ करण्यासाठी विविध संस्था एकत्र आल्या आहेत आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर या रामतीर्थला पुन्हा एकदा रामतीर्थ म्हणून सार्थ ठरवण्यासाठी सरसावल्या आहेत या कामाच्या शुभमुहूर्ताला जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उद्योजक रमेशभाई पटेल, सुनील रायठा,डॉ.रितेश अग्रवाल, मुुंदडा,अरुण अग्रवाल, हेमंत ठक्कर सुरेश केसापूरकर आदींची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button