भक्ताला दर्शन देण्यासाठी देवीच आली रेणुकाई पिंपळगावमध्ये
जळगाव सपकाळ-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी घटस्थापनेने उत्सवाला सुरुवात झाली. संस्थांनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील नवसाला पावणाऱ्या रेणुका मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते, नऊ दिवस दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची मांदियाळी असते. रविवारी दुपारी बारा वाजता घटस्थापने नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली. रेणुका मातेच्या दरबारात सलग नऊ दिवस होम- हवन व धार्मिक कार्यक्रमाचे रेल चेल असते. रेणुका मातेची ख्याती दूरवर पसरलेली आहे. नवसाला पावणारी माता म्हणून पंचक्रोशीतील नागरिकांच्या मनात देवीचे स्थान आहे. हिंदू धर्माप्रमाणे वर्षातून दोन वेळा साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्र उत्सव पिंपळगाव रेणुकाई येथे अनेक वर्षापासून अतिशय उत्साही वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यात्रेच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गर्दी करतात. कबूल केलेला नवस देखील फेडतात .दरवर्षी नवरात्र उत्सवात संपूर्ण गावातून दररोज देवीच्या आरतीला महिला व पुरुषासह तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी असते. संस्थांनकडून मंदिर परिसरात मंडपासह विद्युत रोशनाई करण्यात आली आहे . दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थान व ग्रामपंचायत च्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. रेणुका माता मंदिरात सकाळी चार ते सहा देवीची काकड आरती, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन दोन ते चार भावार्थ पारायण चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा विविध नामांकित महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. असे रेणुका माता संस्थान कडून नियोजन करण्यात आले आहे. असे नऊ दिवस रेणुका माता संस्थान व ग्रामपंचायत व गावकरी यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव साजरा होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172