Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

घर पाडल्याचा आनंद!-अभियंता एस.एन. कुलकर्णी

जालना- जालना शहरातील माजी मंत्री ,आमदार राहत असलेल्या भाग्यनगर सारख्या उच्चभ्रू वस्ती मधील दोन कोटींचे घर सावरकर सेवा सदनासाठी देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्यवीर सावरकर भक्ताला आपले घर पाडल्याचा आनंद होत आहे. एस. एन. कुलकर्णी  सेवानिवृत्त अभियंता असे या भक्ताचे नाव आहे.

समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असलेल्या या अभियंत्याने केवळ आज आपले राहते घर सावरकर सेवा सदनासाठी दिले नाही तर त्यांनी यापूर्वी देखील नूतन वसाहत भागामध्ये एका गरीब कुटुंबासाठी घरही बांधून दिले आहे, त्याही पुढे जाऊन जालना शहरातील हिंदू स्मशानभूमी देखील त्यांनी सुशोभित केली आहे. त्यामुळे इथे अंत्यसंस्कार करण्यासाठी आणलेल्या मृतदेहावर तयार केलेल्या हत्तीच्या सोंडेमधून पुष्पवृष्टी केल्या जाते. खरंतर स्मशानभूमी म्हटले की रखरखते ऊन ,पाण्याचा अभाव, वाढलेली काटेरी झुडपे, असे वातावरण असते, परंतु जालन्याची स्मशानभूमी या सर्वांना अपवाद आहे.इथे हिरवीगार झाडे, ठीक ठिकाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था,पाण्याचे आणि मृतदेहांची हेळसांड होऊ नये म्हणून योग्य पद्धतीचे नियोजन अशी व्यवस्था  केली आहे.

सावरकर सेवा सदनामध्ये 30 विद्यार्थिनी राहतील अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तीन मजली सुसज्ज आणि भव्य इमारत तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध उपयोगी एक सभागृह, वाहनांसाठी वाहन तळ, उद्वाहन (लिफ्ट) आदि सुविधा देण्यात येणार आहेत.

आज एस. एन. कुलकर्णी यांचे घर पाडून तिथे नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी कल्याणराव देशपांडे, रमेश देहेडकर ,बी.वाय कुलकर्णी, कांतराव  शेलगावकर, ऍड बलवंत नाईक, महेंद्र देशपांडे , आदींची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button