“काट दालुंगा ….;बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला व्हाट्सअप आणि व्हॉइस मेसेज द्वारे धमकी
जालना -शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन शिवाजीराव डहाळे व 24 वर्ष राहणार नरनारायण मंदिराजवळ नवीन जालना यांना परदेशातून मोबाईल द्वारे धमकी देण्यात आली. अश्लील भाषेत शिवीगाळही केली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक 5 रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की दिनांक तीन तारखेला ते छत्रपती संभाजी नगर येथे असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मेसेज केला तसेच व्हॉइस कॉल करून असभ्य भाषेत आणि अश्लील भाषेत शिवीगाळही केली आहे. ज्या ज्या मोबाईल वरून हे मेसेज आले आहेत तो मोबाईल परदेशातील क्रमांक आहे.” फक्त अर्जुन डहाळे यांनाच शिवीगाळ करून हा व्यक्ती थांबला नाही तर त्यांनी हिंदूंच्या देवी-देवतांना देखील अश्लील भाषेत शिव्या दिलेल्या आहेत. असेही या तक्रारीत म्हटले आहे. सदर बाजार पोलिसांनी दिनांक पाच रोजी भारतीय दंड संहिता 1860 कलम 298 ,107 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172