त्यांनी माझ्यासाठी कविता लिखली होती! ऐका जि.प.च्या सीईओ वर्षा मीना बाईसाहेब यांच्या या दोन कविता
जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यादेखील एक कवयत्री आहेत .माहीत नव्हतं नं.!
हे गुपित आज एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उघडकीस आलं आहे असं म्हणण्यापेक्षा ते त्यांनीच उघडं केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असताना जीवाची होणारी घालमेल आणि त्यावेळेस पाहिलेले स्वप्न त्यांनी आपल्या “एक सपना” या कवितेमधून व्यक्त केलं आहे आणि दुसरी कविता ही ज्यावेळी नोकरी लागली आणि गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असताना एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन बदली झाली. झाल्यानंतर त्यावेळी त्यांच्या वाहन चालकाने सौ .मीना यांच्यावर कविता लिहिली आणि पुन्हा एकदा कवितेमधील जाणीव, कवितेचा सामान्य माणसावर होणारा, पडणारा प्रभाव, कवितेशी सामान्य माणसाची जुळलेली नाळ ही त्यांच्या लक्षात आली आणि पुन्हा एक त्यांनी आईवर कविता लिहिली. अर्थात कविता या शब्दात लिहिल्यानंतर तर त्या समजतातच परंतु त्यामधील खरी जाणीव होते ती ज्यावेळेस ती कानावर पडते, आणि या कविता कवयित्री वर्षा मीना यांनी आज सादर केल्या. कुठे त्यांनी पहिल्यांदा गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून काम केलं हे जाणून घेण्यासाठी ऐका त्यांनी सादर केलेल्या कविता.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172