“लाडक्या बहिणींनो” कुठे? कसा? कधी ?कोणता?अर्ज करायचा पहा ही अधिकृत माहिती, आणि अर्जही डाऊनलोड करा
जालना – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक मबावी 2024/ 96 दिनांक 28 जून 2024 च्या या निर्णयाला दिनांक एक जुलै 2024 पासून मान्यता देण्यात आली आहे . राज्यांमध्ये ही योजना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना म्हणून कार्यान्वित झाली आहे. या योजनेसंदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत, तसेच या योजनेसाठीच्या अर्ज कुठे? कधी? कसा मिळवायचा? कुठे भरायचा? हे सर्व प्रश्नही उपस्थित झाले आहेत. परंतु शासनाने हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला एक रुपया देखील( उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्रात शिवाय) खर्च ठेवलेला नाही. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन “Nari shakti Dut” हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपण घरी बसून देखील सर्व माहिती भरू शकतो. यासंदर्भात अधिकृत आणि सविस्तर माहिती दिली आहे जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास प्रकल्प विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे -चाटे यांनी. या योजनेसाठी आवश्यक असलेला अर्ज देखील खाली दिलेला आहे.
लाभ घेण्यासाठी अवघ्या पाच अटींची पूर्तता करावी लागणार आहे. ज्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला वय 21 वर्षे पूर्ण आणि साठ वर्षाच्या आत मध्ये. लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक , आणि शेवटची अट लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता ज्या परिवारातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी मंडळ, भारत सरकार किंवा सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दीड हजारांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार- आमदार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक ,सदस्य आहेत .ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्त पणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत.
आवश्यक कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्रात आदिवास असलेले प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न अडीच लाखांपर्यंत, बँक खाते ,पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र,
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया लाभार्थ्यांची ग्रामीण भागातील अर्ज स्वीकृती, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ,ग्रामसेवक यांच्याकडे तर शहरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे देण्यात आले आहे. अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठवण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची आहे. अंतिम मंजुरी देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली समिती.
सर्व प्रक्रियेवर नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रण अधिकारी राहणार आहेत तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी आहेत
योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा अर्ज प्राप्त करण्यास एक जुलै पासून सुरुवात .अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै. तात्पुरत्या यादीवरील हरकती तक्रारी प्राप्त करण्याचा कालावधी 16 ते 20 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट. लाभार्थ्यांचे बँकेमध्ये केवायसी करणे 10 ऑगस्ट .लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला. यासंबंधीच्या अधिक माहिती आणि तक्रारीसाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय इमारत इथे संपर्क साधावा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172