परभणी :- दीक्षारंभ म्हणजे आपल्या आयुष्यातल्या नवीन अध्यायाला सुरुवात करणे होय. ज्ञानाच्या वाटेवर चालण्याची, अनुभवाची शिदोरी बांधण्याची आणि स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची ही वेळ असते .असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ .विलास मोरे यांनी परभणी येथे केले.
गुरुवार दि. 31 जुलै 2025 रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात ‘दीक्षारंभ-2025-26’ या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ विलास मोरे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून दरवर्षी नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचे स्वागत करुन महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग व प्राध्यापकांचा परिचय तसेच विविध समित्या व त्यांच्या कार्याची माहिती या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना देण्यात येते.
यावेळी प्राचार्या डॉ. संगीता आवचार, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र इंगळे, प्रा. परमेश्वर यादव, प्रा. अर्चना लाहोटी, प्रा. कंचन शर्मा, विद्यार्थिनी प्रतिनिधी संस्कृती पद्मवार आदी मान्यवरांची विचार मंचावर उपस्थिती होती. कै. सौ. कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयात प्रवेश घेणे म्हणजे केवळ अभ्यासक्रमात सामील होणे नव्हे तर एका विचार प्रवाहाचा, मुख्य शिक्षणाचा आणि जबाबदारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. महाविद्यालयीन क्षण हा अमूल्य आहे तो गमावू नका, प्रत्येक क्षणाचा वापर करा, प्रश्न विचारा, संवाद करा, सहभागी व्हा, स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी सतत झटत रहा असा मौलिक सल्ला यावेळी डॉ मोरे यांनी विद्यार्थिनींना दिला.
प्राचार्या डॉ.संगीता आवचार यांनी अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करतांना विद्यार्थिनींना सर्वागीण विकासासात शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन केली. डॉ रवींद्र इंगळे यांनी प्रास्ताविक केले, प्रा. अर्चना लाहोटी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.परमेश्वर यादव यांनी आभार मानले. प्रा. डॉ. ओमप्रभा लोहकरे, प्रा.डॉ.अभिजित सरनाईक व प्रा.डॉ.आशा गिरी यांनी महाविद्यालयातील विविध समित्यांची माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa *दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२