जालना- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दिनांक आठ रोजी जालन्यामध्ये आले होते. विविध कार्यक्रम करत संध्याकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत शासनाच्या महसूल विभागाशी निगडित असलेल्या उपाययोजनांचा पाढा त्यांनी वाचला. दरम्यान वीस मिनिट त्यांचे हेच निवेदन सुरू असताना पत्रकार वैतागले आणि त्यांनी मध्येच पत्रकार परिषद ब्रेक केली. तरी देखील त्यांनी माझ्या विभागाची कामे सांगायची आहेत. असे म्हणत पुढील निवेदन थोडक्यात आटोपते घेतले. त्यानंतर सुरू झाला तो पत्रकारांचा प्रश्नोत्तराचा तास .या तासामध्ये सर्वच पत्रकारांनी वाळू चोरी संदर्भात महसूलमंत्रांवर हल्ला चढवला. विविध प्रश्न विचारात वाळू चोरीला खतपाणी घालणारा महसूल विभागच असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच जन्माचे प्रमाणपत्र घोटाळा? शेतीच्या पिक विमा अनुदानात झालेला घोटाळा?या संदर्भात काय झाले .या आणि अन्य प्रश्नांसंदर्भात सुमारे दीड तास ही पत्रकार परिषद सुरू होती. दरम्यानच्या काळात पत्रकार परिषद सुरू असतानाच आमदारांना कंटाळा आल्याचेही यावेळी जाणवले .बदनापूरचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांना यावेळी जांभई मात्र थांबवता आली नाही सविस्तर बातमी वरील व्हिडिओमध्ये.