जालन्यात भर दिवसा पुन्हा खून; खून करताना चा व्हिडिओ व्हायरल
जालना- जालना शहरांमध्ये खून करण्याची मालिका सुरूच आहे. आज बुधवार दिनांक दहा रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली एकाचा खून करण्यात आला. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांनी हा खून होत असतानाचे चित्रीकरण केले. चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढला, तोपर्यंत त्या व्यक्तीचा खून झाला होता.
( हा व्हिडिओ गुन्हेगारीशी संबंधित असल्यामुळे अठरा वर्षाखालील व्यक्तींना पाहण्यास बंदी आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हा व्हिडिओ पहायचा असेल त्यांनी edtvjalna या youtube चॅनलवर जाऊन पहवा)जालन्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मिया साहेब दर्गा परिसरात शेख समीर या तरुणाचा खुसरो या व्यक्तीने खून केल्याचा आरोप होता. खुशरो हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे समजले जाते. त्याने यापूर्वी देखील स्वतःच्या परिवारातील काही व्यक्तींना मारल्याचा आरोप या खुसरोवर आहे. परंतु शेख समीर हा खुसरोच्या परिवारा बाहेरचा व्यक्ती असल्यामुळे अनेक तरुणांचा या खुशरोवर रोष होता. या रोषाचे रूपांतर आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सुमारे सात-आठ तरुणांनी खुसरोला सोबत नेऊन उड्डाणपुलाच्या बाजूलाच असलेल्या मोकळ्या पटांगणात दगडाने ठेचून खून केला आहे. घटनास्थळावर एम एच 21 बी वाय 52 22 ही ज्युपिटर गाडी पोलिसांच्या हाती लागली आहे. दरम्यान याच वेळी रेल्वेच्या उड्डाण पुलावरून जात असताना काही प्रवाशांनी या खुणाचे चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ व्हायरल केला आहे .त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे झाले आहे. घटनास्थळावर प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी ,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नागरे, यांच्यासह पोलिसांच्या इतर टीमने देखील भेट देऊन पाहणी केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172