जालना-अमृतसर येथून “कॅश ऑन डिलिव्हरी ” असलेली आणि पोस्टाने आलेली एक तलवार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पकडली. एक तारखेला अमृतसर येथून ही तलवार जालना येथील छत्रपती संभाजी नगर महामार्गावर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पद्मावती नगर मधील ,सय्यद तोषिफ सय्यद शफिक वय 23 वर्ष याच्यासाठी आली होती. ही तलवार पोस्टातून सोडवून घेऊन तो बाहेर पडत असतानाच दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आणि तलवारीसह सय्यद तोषिफ सय्यद शफिकला रंगे हात पकडले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172