अंबड- अंबड तालुक्यातील मौजे ताड हदगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. या घरकुल वाटपामध्ये ज्यांना स्वतःची घरे आहेत अशांना घरकुल देण्यात आले आहे. परंतु ज्यांना स्वतःची घरे नाहीत असे बेघर अजूनही ग्रामपंचायत मध्ये चकरा मारत आहेत. दरम्यान ज्या ग्रामस्थांना स्वतःचे घरकुल आहे अशा ग्रामस्थांना पुन्हा घरकुल दिले आहे आणि विशेष म्हणजे हे घरकुल गायरान जमिनीवर आणि ताड हदगाव सुखापुरी या रस्त्यावर दिले आहे. त्यामुळे सुखापुरीला जाणारा रस्ता बंद झाला आहे .ही सर्व अतिक्रमणे हटवावीत आणि ती जर हटवल्या जात नसतील तर सर्वच ग्रामस्थांना पुन्हा एक-एक घरकुल द्यावे अशी मागणी ग्रामस्थ कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
दरम्यान या संदर्भात ग्रामसेवक व्ही.एस. भानुसे म्हणाले,” ही घरकुले मी येण्यापूर्वीच दिल्या गेलेली आहेत. परंतु ती अतिक्रमणात आहेत, रस्त्यावर आहेत, का गायरानावर याचा निर्णय ही सर्व मोजणी झाल्यानंतरच होईल. या मोजणीसाठी आम्ही दोन वेळा भुमी अभिलेख कार्यालयाला पत्र दिले आहेत. परंतु अद्याप पर्यंत याची मोजणी झाली नाही त्यामुळे या घरांचा निर्णय प्रलंबित आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172