जालना-
तुझे रूप न्यारे नको त्यास दावू,
सखे आरशाला नको आग लावू:
फुलांचा इरादा तुला छेडण्याचा,
नको एकटी आज तू बागेत जावू.
गझल ही पाडसासारखे आहे हरिणाचे पिल्लू जसे नाजूक, आकर्षक ,नरम, मुलायम असते तशीच गझल आहे. पारशी भाषेतून ती भारतात आली. गझलची पारशी भाषेत व्याख्या म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याबद्दल केलेले भाष्य . असे मत डॉ. शेख इकबाल मिन्नने यांनी व्यक्त केले. मराठी विभाग जे.इ.एस. महाविद्यालय जालना आणि भाषा, साहित्य, संस्कृती, आणि संशोधन परिषद शाखा जालना यांच्या वतीने “त्रैभाषिक गझल मुशायरा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायऱ्याचे हे सातवे वर्ष आहे. या मुशायराच्या अध्यक्ष स्थानावरून आणि सूत्रसंचालन करताना ते बोलत होते.(खलील व्हिडिओत पहा संपूर्ण कार्यक्रम)
कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून डॉ. बा.आ. म. वि. छत्रपती संभाजीनगरचे विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता महमद फारुखी यांच्या हस्ते झाले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. अर्पणा पाटील, प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, भाषा ,साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव गिऱ्हे, यांच्यासह जालना शाखेच्या डॉ. सत्यशीला तौर, कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी हुसे आदींची उपस्थिती होती.
या त्रेभाषिक गझल मुशायरा मध्ये डॉ. शेख इकबाल , छत्रपती संभाजीनगर, योगीराज माने लातूर, युवराज नळे धाराशिव ,जमाल चिस्ती छत्रपती संभाजीनगर, राजेंद्र अत्रे धाराशिव ,भागवत घेवारे धाराशिव, सुनिता कपाळे छत्रपती संभाजीनगर ,यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविकप्रा.डॉ. यशवंत सोनूने यांनी केले सूत्रसंचालन डॉ. एकनाथ शिंदे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.बाबासाहेब खंडाळे यांनी मानले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172