जालना- जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा स्तर उंचावा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यासोबत शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी “महादीप” हा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रत्येक टप्प्यावर त्यांची निवड करण्यात आली. या निवडीतून आज बुधवार दिनांक पाच रोजी एक अंतिम परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेमधून निवड झालेल्या पन्नास विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यासोबत थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची देखील संधी मिळणार आहे. हा सर्व खर्च जिल्हा नियोजन विकास समितीच्या खर्चातून नाविन्यपूर्ण योजनेमधून केला जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये असा प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विद्यार्थ्यांची इन कॅमेरा ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 346 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. इयत्ता पाचवी सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होती.
जालना तालुक्यातील 48, बदनापूर 41, अंबड 44 घनसावंगी 43, परतुर 46, मंठा 40, भोकरदन 44, अशा एकूण पाचवीचे90, सहावीचे 88 ,सातवीचे 88, आठवीच्या 82, अशा 346 मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली .या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच महिन्यात सुमारे सहा दिवसांचा प्रवास असलेला अभ्यास आणि मनोरंजन दौरा केला जाणार आहे. यामध्ये विमानातून, रेल्वेतून आणि सर्वच प्रकारच्या वाहनांमधून विद्यार्थ्यांना प्रवास मिळणार आहे. त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक लॉटरीच आहे.
आज ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली. त्यासोबत 19 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख ,उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, भारत सूर्यवंशी, प्रेरणा मोरे, अर्जुन पवार ,सुनील ढागरगे, निलोफर पटेल, योगेश्वर जाधव, अख्तर सय्यद, शिक्षण विस्तार अधिकारी विनया वडजे, सर्व गट समन्वयक आणि समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक सुनील मावकर हे लक्ष ठेवून होते.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172