जालना- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे शुक्रवार दिनांक सात रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत .
या दौऱ्यामध्ये ते जालना जिल्हा पोलीस प्रशासनाची तपासणी करणार आहेत .पोलीस कवायत मैदानावर त्यांना मानवंदना दिल्यानंतर पोलीस प्रशासन आपली चुणूक त्यांना दाखवणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची जय्यत तयारी रंगीत तालीम सुरू आहे. याच रंगीत तालीमचा आढावा किंवा सुरू असलेल्या सरावाची आज अपर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी पाहणी केली. अतिरेक्यांना पकडून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, बॉम्ब कसे हस्तगत करायचे? ते शोधण्यासाठी श्वानाचा कसा वापर करायचा? बॉम्ब ची शूटकेस कशी हस्तगत करायची? कशी हस्तगत करायची? बॉम्ब कसा नष्ट करायचा या सर्व बाबींचे प्रात्यक्षिक आज पोलीस प्रशासनाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक श्री बारवाल उपाधीक्षक करिष्मा चौधरी यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.