Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “ज्ञानराधा मल्टीस्टेट”चा तपास आता CID कडे; फसवणूकची रक्कम परत मिळण्याची शक्यता!

    पैशांचा नाही; आता पडतोय तक्रारींचा पाऊस? सेवानिवृत्त शिक्षकाला 46 लाखांचा गंडा

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » “ज्ञानराधा मल्टीस्टेट”चा तपास आता CID कडे; फसवणूकची रक्कम परत मिळण्याची शक्यता!
    Breaking News

    “ज्ञानराधा मल्टीस्टेट”चा तपास आता CID कडे; फसवणूकची रक्कम परत मिळण्याची शक्यता!

    EdTvBy EdTvJune 22, 2025No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यात हजारो गुंतवणूकदारांना हजार,लाखो नव्हे तर अब्जावधींचा गंडा घालणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण (CID)विभागाकडे   वर्ग करण्यात आला आहे.

    गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज देण्याचे आम्हीच दाखवून ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने महाराष्ट्रात जाळे पसरवले होते.  या माध्यमातून अनेक व्यवसाय सुरू केले होते त्यातीलच एक होता तिरूमला ऑईलचा व्यवसाय. दरम्यान गुंतवणूकदारांनी  गुंतवणूक केलेली रक्कम वेळेत परत न करू शकल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. या संदर्भात या संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक आशिष पाटोदेकर  आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वच पोलीस ठाण्यांनी अटक करून न्यायालयात देखील हजर केले होते. दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा तपास संबंधित जिल्ह्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु या शाखेला देखील काही मर्यादा आहेत. त्यांच्या मर्यादेनुसार त्या- त्या पोलिस अधिकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केला आहे. कुटे ग्रुपच्या मालमत्ता देखील जप्त केलेल्या आहेत .त्यामुळे हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून पूर्ण झालेला आहे. परंतु जप्त केलेल्या मालमत्तांचे पुढे काय ?आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचे काय? हे प्रश्न मात्र कायम आहेत .त्यामुळेच हा तपास लवकर पूर्ण व्हावा आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळावा या हेतूने हा तपास आता गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचा तपास यापूर्वीच वर्ग केला आहे. तर जालना, धाराशिव, आणि छत्रपती संभाजी नगर ग्रामीणचा तपास दिनांक 18 रोजी सीआयडी कडे वर्ग करावा असा आदेश राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक प्रकाश जाधव यांनी काढले आहेत. जालना जिल्ह्यात 11, छत्रपती संभाजी नगर ग्रामीणमध्ये चार आणि धाराशिव मध्ये एक अशा 16 गुणांचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येणार आहे.

    जालना जिल्ह्याची पार्श्वभूमी जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद ,सदर बाजार, अंबड, परतुर, घनसावंगी, तीर्थपुरी ,भोकरदन ,अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. हा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे .या शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक एम. ए. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे आणि निलेश इधाटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा तपास पूर्ण केला आहे .एकूण 11 गुन्ह्यांमध्ये तक्रारदारासह सुमारे 4500 गुंतवणूकदारांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविल्या आहेत आणि त्यानुसार ही रक्कम हजारात लाखात नव्हे तर अब्जावधीमध्ये आहे .म्हणजेच दोन अब्ज  51 कोटी , सोप्या भाषेमध्ये 251 कोटी असे देखील वाचता येईल आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील सुमारे 91 कोटींची मालमत्ता उठवलेली आहे . 91 कोटी हा आकडा शासकीय मूल्यांकनानुसार होतो. प्रत्यक्षात  हा आकडा बाजार मूल्यांकनानुसार चौपट होऊ शकतो. तपास लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, फुलसिंग गुशिंगे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे ,रवी गायकवाड, गजू भोसले, अंबादास साबळे ,मंदा नाटकर जया निकम, निमा घनघाव हे कार्यरत होते.

                            FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
       *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    # छत्रपती संभाजी नगर# धाराशिव# फसवणूक# राज्य गुन्हे अन्वेषण विभाग# पोलीस महासंचालक# पोलीस अधीक्षक# जालना जिल्हा #CID#crime investgation deparment #eow# आर्थिक गुन्हे शाखा# ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी# सुरेश कुटे# तिरूमला ऑइल#Dnyanradha multi state
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleपैशांचा नाही; आता पडतोय तक्रारींचा पाऊस? सेवानिवृत्त शिक्षकाला 46 लाखांचा गंडा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    पैशांचा नाही; आता पडतोय तक्रारींचा पाऊस? सेवानिवृत्त शिक्षकाला 46 लाखांचा गंडा

    June 22, 2025

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025

    42 कोटींच्या शेती अनुदान घोटाळ्यात आणखी 11 कर्मचारी निलंबित(crop subsidy scam)

    June 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,044 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,181 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025797 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025724 Views
    Don't Miss
    Breaking News June 22, 2025

    “ज्ञानराधा मल्टीस्टेट”चा तपास आता CID कडे; फसवणूकची रक्कम परत मिळण्याची शक्यता!

    जालना- जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यात हजारो गुंतवणूकदारांना हजार,लाखो नव्हे तर अब्जावधींचा…

    पैशांचा नाही; आता पडतोय तक्रारींचा पाऊस? सेवानिवृत्त शिक्षकाला 46 लाखांचा गंडा

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    42 कोटींच्या शेती अनुदान घोटाळ्यात आणखी 11 कर्मचारी निलंबित(crop subsidy scam)

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “ज्ञानराधा मल्टीस्टेट”चा तपास आता CID कडे; फसवणूकची रक्कम परत मिळण्याची शक्यता!

    पैशांचा नाही; आता पडतोय तक्रारींचा पाऊस? सेवानिवृत्त शिक्षकाला 46 लाखांचा गंडा

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.