आता जालन्यातही मिळेल चित्रपटाचं ऑनलाइन तिकीट
जालना- सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत गेले आणि प्रत्येक गोष्टी मध्ये डिजिटल ही यंत्रणा कार्यरत होत गेली. मात्र काही ठिकाणं अशी होती की, तिथे डिजिटल यंत्रणा सुरू करणे अवघड होते. परंतु कोरोना या जागतिक महामारी ने ही यंत्रणा कार्यान्वित करणे भाग पाडले आणि याचा फायदा घेत जालन्यातील “नीलम सिनेप्लेक्स” या चित्रपट ग्रहांमध्ये चित्रपटांसाठी आता ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळेआता ना गर्दीची चिंता ना तिकिटासाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ.
जिल्ह्यामध्ये ऑनलाईन तिकीट बुक करणारे बहुदा “नीलम सिनेप्लेक्स” पहिलच चित्रपटगृह असावे. दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे बंद ठेवावे लागलेल्या या चित्रपट गृहाने आता कात टाकली आहे आणि नवीन स्वरूप धारण करून उद्या पाडव्याला पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या सेवेत हजर होत आहे.
दरम्यानच्या काळात भरपूर वेळ मिळाल्यामुळे या थिएटर मध्ये अत्याधुनिक आणि वेगवेगळ्या दुरुस्त्याही केल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे जालन्यात या एकाच चित्रपटगृहात एकाच वेळी 2 चित्रपट चालू असतात. घरून निघाल्यानंतर इथे येई पर्यंत कोणता चित्रपट पाहायचा याच्यावर एकमत जर झालं नाही तर दोन्ही चित्रपट पाहता येतील अशी व्यवस्था येथे आहे. याचे कारण म्हणजे दोन्ही चित्रपटांच्या मध्ये अर्ध्या तासाचे अंतर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही संधी मिळणार आहे .
नूतनीकरणाच्या कामांमध्ये एक महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली आहे आणि ती म्हणजे परिवारासह आलेल्या प्रेक्षकांना कदाचित तिकीट काढण्यासाठी वेळ लागत असेल तर महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेले सोफासेट हे प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देतात.
दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर उद्या शुक्रवार दिनांक 5 रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हे चित्रपट गृह पुन्हा एकदा सुरू होत आहे. आणि बोहणीचा चित्रपट म्हणून “सूर्यवंशी” हा हिंदी मध्ये तर “इटर्नलस” हा इंग्रजी चित्रपट प्रेक्षकांसाठी येत आहे.
कोविड च्या काळात सर्वात मोठी भीती होती ती गर्दीची! आणि ही गर्दी टाळता यावी म्हणून इथे मोठा बदल केला गेला आहे आणि तो म्हणजे प्रवेशद्वारांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे एकाच प्रवेशद्वारातून होणारी गर्दी टाळता येऊन अन्य ठिकाणाहून देखील प्रेक्षकांना चित्रपट गृहात जाता येणार आहे. त्यासोबत एकाच इमारतीमध्ये दोन चित्रपटगृह असल्यामुळे एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी देखील चित्रपटांच्या मध्यंतरा मध्ये आणि वेळे मध्ये अर्ध्या तासाचा अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून ही गर्दी कमी होईल .
पूर्वी केवळ पॉपकॉर्न आणि तत्सम समोसे, कचोरी, मिळण्याच्या ठिकाणी आता नवीन कँटीनच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना लागणाऱ्या पिझ्झा-बर्गर ची देखील आता व्यवस्था झाली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी जर ठरवलं तर दोन चित्रपट पाहता येतील आणि किमान सहा तास तरी बाहेरच्या जगापासुन अलिप्त राहून निवांत क्षण इथे घालवता येतील.
*अशी करा ऑनलाईन बुकिंग* या चित्रपट गृहचे तिकीट बुक करण्यासाठी, “बुक माय शो” या ऑनलाईन पोर्टल वर जाऊन जालना विभाग आणि त्यामध्ये नीलम सिनेप्लेक्स शोधल्यानंतर या थिएटरचे ऑनलाईन तिकीट बुक होईल. अशी माहिती नीलम सिनेप्लेक्सचे संचालक शेखर जैस्वाल यांनी दिली .
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172
डाउनलोड करा
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.ap