Advertisment
जालना जिल्हा

दोन दुचाकीस्वारांना उडून बस घुसली गोठ्यात. जीवितहानी नाही.

वाघरुळ- जालना देऊळगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक बस दोन दुचाकीस्वारांना उडवून गोठ्यामध्ये घुसली सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही .मात्र दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जालना -देऊळगाव राजा रस्त्यावर वाघरुळ येथील बस स्थानक आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एम एच- 20 -23 86 या बसने दोन दुचाकीस्वारांना ठोस दिली, आणि परत एका ट्रॅक्टरला कट मारून रस्त्याच्या बाजूला असल्यास गोठ्यामध्ये ही बस घुसली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. दोन दुचाकीवरील जखमींना वाघ्रूळ ग्रामपंचायतचे सदस्य प्रभाकर खरात आणि जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात यांनी रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. दरम्यान नवीन झालेल्या या रस्त्यावर वाहनांना वेगाची मर्यादा राहिली नाही .त्यामुळे किमान गावाजवळ तरी गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.
-edtv news jalna
डाउनलोड करा.
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button