शेलापागोट्यांच्या अतिषबाजीत 7 कोटी 11 लाखांच्या कामांचे भूमिपूजन.
जालना- शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये, सात कोटी अकरा लाखांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास गोरंट्याल नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल, अक्षय गोरंट्याल, स्नेहा जोशी भास्करराव दानवे, यांच्यासह नगरसेवकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान आज या उद्घाटनाप्रसंगी गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर सुरू असलेल्या कारवाई संदर्भात शेलापागोटे रंगले. विशेष म्हणजे मंत्री दानवे आणि आमदार गोरंट्याल या दोघांनीही अर्जुन खोतकर यांचे नाव घेतले नाही, मात्र त्यांच्यावर बोलण्याची एकही संधी सोडली नाही. या दोघांनी केलेल्या अतिषबाजी चा कार्यकर्त्यांनी मात्र आनंद लुटला.
*ही होणार विकासकामे*
1)प्रभाग क्रमांक 1 मधील बालाजी चौक ते नविन मोंढया कडे जाणारा चौपदरी सिमेंट रस्ता, तीन कोटी.
2 )प्रभाग 7 मधील नंदा मित्तल यांचे घर ते महेश आकात शाखा त्यांच्या घरापर्यंत चा रस्ता 50 लाख.
3) प्रभाग 1 मधील माणिक नगर येथे सभामंडपाचे बांधकाम , 10 लाख. 4)शहरात विविध ठिकाणी बगीच्या विकसित करणे आणि खुला व्यायाम शाळा उभारणे 3 कोटी. आदी कामांचा समावेश आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app