Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » परळीच्य थर्मल मध्ये इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार- पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश; महानिर्मितीने काढली निविदा
    राज्य

    परळीच्य थर्मल मध्ये इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार- पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश; महानिर्मितीने काढली निविदा

    EdTvBy EdTvDecember 5, 2021Updated:December 5, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    लातूर-परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळश्याबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. श्री. पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


    पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे की , ग्लास्गो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सन 2050 पर्यंत 50 टक्के कमी करण्याचा संकल्प जाहीर करत इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळश्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बांबू आणि जैवभारावर आधारित इंधन विटाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील किमान एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दहा टक्के जैवभारावर आधारित इंधन विटा अथवा बांबूचा वापर बंधनकारक असल्याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या संकल्पनेला महाराष्ट्रात मूर्त रूप देण्यासाठी राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा केला होता. 16 जुलै 2021 रोजी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून औष्णिक वीज निर्मिती केंद्रात इंधन म्हणून बांबू अथवा जैवभार इंधन विटाचा वापर करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रात जैवभार अर्थात बांबूचा वापर करण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट 2021 मध्ये अभ्यास समिती गठीत केली होती. आता औष्णिक वीज निर्मिती केंद्रातर्फे ब्रिकेट अर्थात बांबूचे तुकडे पुरवठा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली.


    काही दिवसांपूर्वीच लातूर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पाशा पटेल यांच्या संपर्क कार्यालयात बांबू लागवडीसंदर्भात बैठक घेऊन उद्योजकांना मार्गदर्शन करून बॉयलरमध्ये दगडी कोळश्याऐवजी पर्यावरणपूरक बांबूचा वापर वाढवून पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते.
    पटेल यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, बांबू शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी आपण सुरु केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतीसाद मिळत असून, हजारो शेतकऱ्यांनी बांबूची शास्त्रशुध्द लागवड करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या बांबूला चांगला भाव मिळावा व दगडी कोळसा जाळल्यामुळे हवेतील वाढणारे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. इंधन म्हणून बांबूचाही वापर करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी, असे आवाहन श्री. पटेल यांनी केले आहे.

    संग्रहित विडिओ,दि.3 ऑक्टोबर रोजी जालना येथे लायन्स क्लब च्या कार्यक्रमात बोलताना पाशा पटेल

    *दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com
    डाउनलोड edtvjalna app

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    edtv kalika parli pasha patel tharmal
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleभोकरदन तालुक्यातून 40 लाखांचा दोन क्विंटल गांजा जप्त
    Next Article शेलापागोट्यांच्या अतिषबाजीत 7 कोटी 11 लाखांच्या कामांचे भूमिपूजन.
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    June 16, 2025

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    June 15, 2025

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    June 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,034 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,179 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025780 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025724 Views
    Don't Miss
    Breaking News June 16, 2025

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    जालना – विविध प्रकारचे प्रकल्प हाताळायला दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा विकास होतो. परंतु क्षमतेपेक्षा जास्त मोठा प्रकल्पाचे…

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    उघड्या डीपी ने घेतले तीन गाईंचे प्राण

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.