Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

.…त्याने संगीता लाहोटी यांचा खून करून स्वतःही पिले विष

जालना- मला फोन नंबर का देऊ दिला नाही असे म्हणत रागाच्या भरात 57 वर्षीय महिलेला चाकूने भोसकून स्वतः नाही विष पिल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालना शहरात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे दिवसभर पोलीस प्रशासन चांगलेच कामाला लागले होते.

या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन अभय लाहोटी, वय 26 वर्षे शासकीय गुत्तेदार जालना, यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे काका अलोक लाहोटी यांनी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या जितेंद्र नाथांनी यांना या प्रकरणातील आरोपी भीमराव निवृत्ती धांडे, राहणार मंमादेवी नगर, अंबड रोड जालना याला फोन नंबर देऊ नका असे सांगितले. लाहोटी यांच्या या वर्तणुकीचा धांडे याला राग आला,  त्याने आलोक लाहोटी यांना मारहाण करून दगडाने घराच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे लाहोटी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीचा राग मनात धरून पोलिसांनी सांगितल्यानुसार भीमराव धांडे याने वैद्यकीय तपासणी करायला न जाता सकाळी साडेआठ ते नऊ च्या सुमारास पुन्हा आलोक लाहोटी यांच्या पोस्ट ऑफिस जवळ घरांमध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये असलेल्या संगीता अलोक लाहोटी, वय 57 यांना चाकूने भोसकून त्यांचा खून केला .याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भादवि कलम 302 नुसार भीमराव धांडे याने खून केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे .त्यानंतर धांडे याने त्याच ठिकाणी स्वतः देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला वेळीच मज्जाव करून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button