जालना- जालना जिल्ह्यातील चार नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरायला लागला आहे. विशेष करून भाजपच्या मतदारसंघात केवळ राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार घिरट्या घालायला लागले आहेत. आतापर्यंत फक्त भाजपच विरोधक आहे असे समजणाऱ्या जनतेला काँग्रेसचा खरा विरोधक राष्ट्रवादी देखील असल्याचे आता कळायला लागले आहे, आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
दरम्यान तालुक्याचे ठिकाण असलेल्या जाफराबाद नगरपंचायत च्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे आले होते. त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलीच टीका केली. फक्त एवढेच नव्हे तर खडे बोल सुनावले. जाहीर सभेत बोलताना नितीन राऊत यांच्या सोबत काँग्रेसचे प्रभारी रामकिसन ओझा, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत असताना ते म्हणाले केंद्रीय मंत्री आणि त्यांचे सुपुत्र आमदार असतांना देखील जाफराबाद तालुक्याचा विकास झाला नाही. त्यामुळे… तसेच मागील निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन भाजपाच्या दावणीला बांधले गेलेले राष्ट्रवादीचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षाने विकत घेतले आणि तेही विकल्या गेले. राष्ट्रवादीचे लोक पैशासाठी विकल्या जातात असा उघड उघड आरोप त्यांनी केला. दरम्यान जालन्या चे पालकमंत्री राजेश टोपे यांना घनसावंगी शिवाय इतर जिल्हा दिसतच नाही, आणि ते काही करूही शकत नाहीत, त्यांच्याच मतदारसंघात उटवद आणि सागर का साखर कारखाना जवळ दोन वीज उपकेंद्र मी दिले आहेत, मात्र आत्तापर्यंत त्यांना ते कधीही करता आले नाहीत, ही तर टोपेंची व्यथा आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन बोलायचं ठरलं तर सध्या ज्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत हे शरद पवार काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री झाले आणि ते काँग्रेसने केले होते.आता ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत, असे असताना देखील त्यांना साधे मुख्यमंत्री देखील होता आले नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदावर नियुक्ती देऊन विकासाची गंगा फक्त काँग्रेसच आणू शकते असा दावाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला .शुक्रवारी रात्री जाफराबाद शहरात झालेल्या या सभेला काँग्रेस पक्षाने उभे केलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna