“टाकाऊ प्लास्टिक द्या आणि टिकाऊ पिशवी घ्या” राष्ट्रीय सणानिमित्त विशेष उपक्रम उपक्रम
जालना-प्लास्टिक कचरा हे आजच्या काळात सर्वात मोठा प्रश्न बनत चालला आहे .अनेक वर्षांनी सुद्धा प्लास्टिकचे विघटन होत नाही. तेव्हा त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक संकलन वर्गीकरण पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे. याचाच एक भाग म्हणून “ग्रीन आर्मी सृष्टि फाउंडेशन” आणि “मैत्र मांदियाळी” यांनी प्लास्टिक मुक्त जालना चे आवाहन केले आहे.
26 जानेवारी 2022 या राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर गांधीचमन आणि शिवाजी पुतळा या दोन ठिकाणी संकलन केले जाणार आहे. त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील प्लास्टिक कचरा या ठिकाणी जमा करावा.जमा झालेला कचरा पूर्ण इकोविजन कडे पाठवण्यात येणार आहे यात प्लास्टिकचे डबे, खेळणी, पाण्याच्या बाटल्या, छोट्या व मोठ्या पॉलिथिन पिशवी, यांचा समावेश असेल. यासाठी मैत्र मांदियाळी चे अजय किंगरे आणि त्यांचे सहकारी तसेच सृष्टि फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. संध्या जहागीरदार, संजीवनी देशपांडे ,विद्या पाटील, तारा काबरा, जयश्री कुणके, शारदा व्यवहारे, शैला पोपळघट, संगीता मुळे, राजश्री मुर्गे, हे सहकार्य करत आहेत. डॉक्टर प्रतिभा श्रीपत यांनी जालनेकरांना आवाहन करताना सांगितले की प्लास्टिक कचरा च्या मोबदल्यात जालनेकरांना कापडी पिशवी मोफत मिळणार आहे. तसेच भविष्यात जालन्यात विविध ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभे राहणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna