क्राईम ब्रँच पोलीस सांगून महिलेला लुटले; एक लाख 17हजारांचा ऐवज लंपास
जालना-” मी क्राईम ब्रँच चा पोलीस आहे”. असे सांगून एका वृद्ध महिलेची( एम. एच.- 21 ए सी 20 14) ही दुचाकी अडवून तिला लुटल्याची घटना आज दिनांक 3 रोजी भर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठा चौफुली भागात म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या लीला मदनलाल सोनी वय 68, या आपल्या दुचाकीवरून बाजारात येत होत्या. अमर छाया टॉकीज जवळ आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोघेजण आले, आणि आम्ही किती वेळा पासून तुम्हाला आवाज देत आहोत, तुम्ही थांबतच नाहीत. अशी थाप मारली. त्यासोबत पुढे पोलीस तपासणी चालू आहे असे सांगून तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा असे, म्हणत लीला सोनी यांच्याकडून सर्व दागिने काढून घेऊन एका बॅग मध्ये ठेवले . या भामट्यांनी ही बॅग लंपास केली .दरम्यान लंपास केलेल्या सोन्याच्या ऐवजा मध्ये, 12 ग्राम सोन्याची 40 हजारांची गळ्यातील तुळशीची माळ.
10 ग्राम सोन्याच्या 30 हजारांच्या बांगड्या ,7 ग्राम वजनाची 20 हजाराची गळ्यातील चैन .9 ग्राम वजनाच्या 27 हजारांच्या दोन अंगठ्या, असा एकूण एक लाख 17 हजारांचा ऐवज भामट्यांनी पळवून नेला आहे. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी करून पुढील तपास सुरू आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna