Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा आटोपला पंधरा मिनिटात वार्षिक तपासणी दौरा; स्थानिक अधिकाऱ्यांनी काजू बदाम खाऊ घालून केले रवाना

जालना- जालना रेल्वे स्थानकाची वार्षिक तपासणी करण्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक अमित जैन हे आज जालन्यात आले होते. ते येणार यासाठी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी अवाढव्य पैसा खर्च करून रेल्वे स्थानकाची सजावट केली, रांगोळी काढल्या मात्र निकृष्ट का दर्जाचे काम ते झाकू शकले नाहीत. स्थानकावर पाणी पिण्याच्या नळानभोवती मारलेले सिमेंट आणि रस्त्यावरील खड्डे झाकून टाकण्यासाठी मारलेले सिमेंटवर पाणीच न टाकल्यामुळे एकाच दिवसात या कामांची माती झाली आहे. तसेच स्थानक परिसरात असलेल्या रस्त्यांची डागडुजी केल्या गेली मात्र रेल्वेच्या हद्दीत असलेल्या सरस्वती कॉलनी, विद्युत कॉलनी, रेवगाव रोड, बँक कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यात मुरूम टाकण्याचाही त्रास रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.

एका विशेष रेल्वेने आलेल्या महाव्यवस्थापकांना फलाट क्रमांक तीन वरून पीट लाईनचे काम दाखवण्यासाठी नेले याच वेळी त्यांनी रेल्वेच्या दवाखान्याची ही तपासणी केली, तिथे लावलेल्या एका पल्स पोलिओच्या पोस्टरची त्यांनी माहिती घेतली असता स्थानिक अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली, परंतु हे पोस्टर 27 फेब्रुवारी 2021 चे आहे हे त्यांनी सांगितलेच नाही. त्यानंतर पत्रकारांसोबत झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये पत्रकारांनी विविध समस्यांचा भडीमार केल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रश्नाला फाटा मारला, महाव्यवस्थापक अमित जैन यांना काजू, बदाम, पिस्ता खाऊ घालून सरळ रेल्वेत नेऊन बसवले, आणि अवघ्या पंधरा मिनिटात जालना रेल्वे स्थानकाचा वार्षिक पाहणीचा दौरा आटोपला. ईडी टीव्ही च्या प्रतिनिधीने विचारलेल्या तीनही प्रश्नांची उत्तरे गोलमोल पद्धतीने देऊन स्थानिक प्रशासनावर व्यवस्थापकांनी पांघरूनच घातले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button