पळण्याचा सराव आहे? मग घ्या सहभाग आणि मिळवा बक्षीस,
जालना- फॅब( आनंददायी) ग्रुपच्या वतीने जालना शहरात दिनांक 29 जानेवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे करण्यात आले आहे. तीन वयोगटात आणि पाच 10 आणि 21 किलोमीटर अशा तीन अंतराच्या या स्पर्धा आहेत. या संदर्भात आयोजकांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
कोरोनाचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 1800 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत आणि बहुतांश नोंदणी देखील पूर्ण झाली असल्याची माहिती या ग्रुपचे अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी आज दिली. वेगवेगळ्या गटांमध्ये प्रत्येकी 18 बक्षिसे देण्यात येणार आहे. जालना शहरातील मंठा चौफुली भागात असलेल्या कलश सिड्स च्या मैदानावरून ही स्पर्धा मंठा रोड कडे असलेल्या तीन ठिकाणापर्यंत जाऊन परत याच ठिकाणी येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या रनर्स ग्रुपचे पदाधिकारी धर्मेश उजवणे, अजय सिंगला, प्रशांत भाले, विष्णू पाटेकर, कैलास जाधव, धनसिंग सूर्यवंशी, ईश्वर बिलोरे, अनिल मालपाणी, संजय शेजुळ, शिवाजी हिवराळा, संजय अकोलकर, आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहे.**
- दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com