अंबड ला तलाठ्याच्या घरी दरोडा;साडेचार लाखांच्या रोकडसह 6 लाखांचा मुद्देमाल लंपास.
अंबड-येथील यशवन्त नगर भागात राहणारे तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावसे,वय 31 यांच्या घरी 6 दरोडेखोरांनी आज पहाटे दरोडा टाकला.या दरोड्यात सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.घटना स्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास 6 दरोडेखोरांनी श्री.पावसे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि शस्त्राचा धाक दाखवला .पावसे यांनी विरोध केल्या नंतर त्यांना मारहाण करण्यात आली.शेजारी असलेल्या घरांचे देखील कडी कोंडा तोडण्यात आले आहेत.
चोरी गेलेल्या मुद्देमालमध्ये साडेचार लाख रुपये रोख तसेच 50 हजारांचा एक तोळ्या चा नेकलेस,50 हजारांची एक पोत, आणि अन्य दागिने असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भदवी 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com