![]()
बदनापूर- वारंवार सूचना देऊनही, सूचना दिल्यानंतरही काही फरक न पडल्यामुळे गुन्हे दाखल केल्यानंतरही वागणुकीमध्ये काहीच फरक न पडल्याने बदनापूरच्या चार खाटीकांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू यांनी ही कारवाई केली.

1) शेख शकील शेख लाल वय-50 वर्षे रा. कुरेशी मोहल्ला बदनापुर2) शेख रफीक शेख छोटु वय-56 वर्षे रा. कुरेशी मोहल्ला बदनापुर3) आयाज करीम कुरेशी वय-27 वर्षे रा. कुरेशी मोहल्ला बदनापुर4) शफीक आब्बास शेख वय-44 वर्षे रा. कुरेशी मोहल्ला बदनापुर . यांच्यावर पोलीस ठाणे बदनापुर येथे गोवंश कत्तलीचे तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही टोळी वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे दिसून येत होते, या टोळीने असे कृत्य चालूच ठेवले होते, वारंवार गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांचे मध्ये सुधारणा होताना दिसुन येत नव्हती, त्यामुळे या टोळीला जालना जिल्ह्यातून बाहेर घालवणे गरजेचे असल्याचे मत पोलीस प्रशासनाचे झाले, त्यामुळे त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावरुन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी जालना जिल्हयातुन पुढील सहा महिण्यासाठी वरील सर्व ईसमांना हद्दपार करण्याचे आदेश पारित केलेला आहे. सदर आदेशा प्रमाणे आज रोजी वरील ईसमांना जालना जिल्हयाचे बाहेर सोडण्यात आलेले आहे. या कारवाईमुळे असे प्रकार होण्यावर आळा बसेल याची खात्री आहे.
– दिलीप पोहनेरकर,9422219172






Leave a Reply