![]()
जालना-पंधरा वर्षे आणि त्यावरील शिकवू , नव- साक्षर,व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी, आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी आणि जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इत्यादी बाबींविषयी केंद्रशासन “उल्हास, नवभारत साक्षरता कार्यक्रम” राबवीत आहे. या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील जे व्यक्ती वरल बाबींपासून अनभिज्ञ आहेत, त्यांना या प्रवाहात अनन्यासाठी शिक्षकांमार्फत एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वेनुसार जिल्ह्यामध्ये एकूण 23 हजार 807 व्यक्ती अशा निघाल्या आहेत की ज्यांना वरील शिक्षणाची गरज आहे. अशा या गरजूंना शिक्षकांनी किंवा समाजातील शिक्षित वर्गाने या बाबी शिकविल्या आहेत. या शिकवलेल्या बाबींची उद्या दिनांक 25 रोजी ज्या ठिकाणी या व्यक्तींना शिकवले त्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे.

या एकूण उल्हासित झालेल्या गरजूंमध्ये पुरुष 9311 महिला 14,491 अशा एकूण 23 हजार 807 उमेदवार परीक्षा देणार आहेत. त्यापैकी मराठी माध्यमातून 2250 तर उर्दू माध्यमातून १२५७ नागरिक ही परीक्षा देतील. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जास्त उल्हासित असलेले उमेदवार हे भोकरदन तालुक्यात 4603 एवढे आहेत तर सर्वात कमी परतुर तालुक्यात १७३७ एवढी संख्या आहे.
या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे स्थानिक रोजगार पुनर कुशलता, उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नव साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम राबविला जात आहे. पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये या अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे व्यावसायिक कौशल्य विकसित होईल असा आशावाद शासनाला वाटतो.
– दिलीप पोहनेरकर,9422219172






Leave a Reply