![]()
जालना- जालना शहर मनपाला लाज कधी वाटेल? अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाने सभा त्याग करावा, आरडा ओरड करावी, सत्ताधाऱ्यांचे कपडे फाडावेत. हे आपण समजू शकतो. परंतु सत्ताधाऱ्यांनीच कपडे फाडावेत आणि आणि पाणीपुरवठा सारखा महत्त्वाचा विभाग सांभाळणाऱ्या सभापतींना न बोलू दिल्यामुळे संतापून सत्ताधारी असलेल्या सभापतींवर सभात्याग करण्याची वेळ आणावी ही लाजिरवाणी गोष्ट जालना महानगरपालिकेतील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांवर आली आहे.

आज जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये पाणीपुरवठा सभापती पुनम स्वामी या वारंवार पाणीपुरवठ्याच्य समस्या सांगण्यासाठी उभ्या राहत होत्या. परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांना बोलूच दिले नाही .त्याच सोबत महापौरांनी देखील सभापतींच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करत राहिल्या. त्यामुळे संतापलेल्या सभापती पूनम स्वामी यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही बोलू देत नसल्यामुळे सभा त्याग केला.
महानगरपालिकेत विरोधक म्हणून शिंदे सेनेची भूमिका आहे. सभागृहात सत्ताधारीत एक दुसऱ्याचे कपडे फाडत आहेत हे पाहिल्यानंतर शिंदे सेनेचे सर्वच उमेदवार बाहेर येऊन बसले . यासंदर्भात शिवसेनेच्या नगरसेविका दर्शना खोतकर झोल काय म्हणाल्या, आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वीरेंद्र भोका यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पहा वरील व्हिडिओमध्ये.
दिलीप पोहनेरकर,9422219172














Leave a Reply