बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

“त्या अधिभारातून” मालमत्ता धारकांची सुटका; पाच मिनिटात भरा मशीन द्वारे कर.

Loading

जालना- जालना शहर महानगरपालिकेमध्ये सर्वात वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे मालमत्ता विभाग. या विभागातील कोणतेच कर्मचारी तुमच्या घरी थकबाकी मागायला किंवा कर भरा!असे असे म्हणायला आले नसतील.

परंतु तुम्हाला स्वतःहून जरी इथे कर भरायची इच्छा असेल तरी त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांना आधी “अधिभार” द्यावा लागायचा आणि मगच तुमचा कर किती आहे हे समजायचे. कारण एखाद्याचा जर चार वर्षाचा कर थकला असेल तर चालू वर्षाचा एक कर तुम्ही भरायचा त्याची पावती घ्यायची, त्यानंतर एका एका वर्षाचा कर संबंधित कर्मचाऱ्याला द्यायचा, आणि राहिलेल्या दोन वर्षाचा कर कर्मचारी आणि मालमत्ता धारक यांच्या संगनमताने बुडवून महानगरपालिकेला चुना लावायचा असा आत्तापर्यंतचा कार्यक्रम होता.

आता ती परिस्थिती बदलली आहे महानगरपालिकेने कात टाकत नवीन एक मशीन खरेदी केले आहे ज्या मशीन मुळे तुम्हाला महानगरपालिकेतील मालमत्ता विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भेटायची गरज नाही आणि अवघ्या पाच मिनिटात तुम्ही तो कर भरू शकाल. एवढेच नव्हे तर आत्तापर्यंत तुम्ही किती कर भरला हे देखील तुम्हाला कळणार आहे तुमच्या मोबाईलवर फक्त फक्त तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या मालमत्तेच जोडावा लागेल सविस्तर बातमी वरील व्हिडिओमध्ये.

– दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *