![]()
जालना- जालना रेल्वे स्थानकातून सोमवारी दिनांक 26 रोजी अकरावाच्या सुमारास एक प्रवासी गांधी चमन कडे जात होते. त्याच दरम्यान या प्रवाशाला पाठीमागून दोघे जणांनी येऊन चमनवर सोडण्याचा बहाना केला आणि त्यांना गाडीवर बसून निरामय हॉस्पिटल समोर असलेल्या एका गल्लीमध्ये नेले. या गल्लीत नेल्यानंतर लघुशंकेसाठी एक जण खाली उतरला आणि दुसऱ्याने या प्रवाशाच्या पाठीमागून येऊन गळ्याला चाकू लावला. चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील रोख रक्कम लुटून फरार झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आज दिनांक 28 रोजी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
त्यापैकी एक जण रेल्वेच्या निवासस्थानात राहणार सौरभ सुगंध हिरे 19 वर्ष, आणि दुसरा याच रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या जमुना नगर भागात राहणारा दिव्यांशु दिलीप सोनवणे , 19 वर्ष हे आहेत. या दोघांनाही आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. सविस्तर बातमी वरील व्हिडिओमध्ये.
–सविस्तर बातम्या पाहण्यासाठी
https://www.edtvjalna.com
व्हाट्सअप्पचॅनल*https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://youtube.com/@edtvjalna5167?si=ETSi4wDYgdJADgjK
–दिलीप पोहनेरकर,9422219172











Leave a Reply