बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

झळा दुष्काळाच्या! ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी 125 कोटींचा आराखडा

Loading

जालना -https://www.edtvjalna.com ची बातमी आपण वेगवेगळ्या सात भाषांमध्ये वाचू शकता आणि मातृभाषेत पाहू आणि ऐकू शकता. आता वळूयात आजच्या बातमीकडे


दुष्काळ तर जाहीर झालाच आहे परंतु अजून दुष्काळाच्या झळा पोहोचायला सुरुवात झाली नाही. त्या पोहोचण्यापासून टाळताही येणार नाहीत. अशी परिस्थिती सध्या आहे या.  परिस्थितीमध्ये सर्वात जास्त भीषण समस्या असते ती पाण्याची आणि याच पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील परतुर आणि मंठा हे दोन तालुके वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने 4226 प्रस्तावित योजना आखल्या आहेत .या योजनांचा फायदा जालना जिल्ह्यातील 3537 गावांना आणि 457 वाड्यांना होणार आहे यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा ऑक्टोबर 2026 ते जून 2027 पर्यंतचा आहे.
सध्याच्या परिस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये एकूण 10 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत आणि 68 टँकरद्वारे 49 गावे आणि 16 वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे.


आता पाहूया पुढील नियोजनाची सविस्तर बातमी.
जालना तालुक्यामध्ये 469 प्रकारच्या विविध योजना प्रस्तावित आहेत ज्यामध्ये नवीन विंधन विहिरी, खाजगी विहीर अधिग्रहीत करणे, बैलगाडी किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे. नळ योजना विशेष दुरुस्ती. तात्पुरती पूरक नळ योजना. अशा योजनांचा समावेश आहे .तालुक्यातील 243 गावांना आणि 88 गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे .
बदनापूर तालुक्यातील 406 गावांना पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे.
अंबड तालुक्यामध्ये 489 गावे उपाय योजनेसाठी प्रस्तावित आहेत. घनसावंगी तालुक्यामध्ये 480 गाव प्रस्तावित आहेत. परतुर तालुक्यात 340 गाव या योजनेसाठी प्रस्तावित आहेत. मंठा तालुक्यात मध्ये 293 गावे आणि एक वाडी या योजनेच्या प्रस्तावित कामामधून पाणीपुरवठा केला जाईल. भोकरदन तालुक्यात 810 कामे  प्रस्तावित आहेत. या मधून 744 गावांना आणि एका वाडीला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
जाफराबाद तालुक्यात 572 योजना प्रस्तावित आहेत त्यामधून 542 गावांना पाणीपुरवठा केल्या जाणार आहे.
तूर्तास जरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा असला तरी जानेवारीत हे प्रकल्प कोरडे टाक पडणार आहेत .त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. या नियोजनानुसार सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये 46% पाणी आहे या प्रकल्पामध्ये आवश्यकतेनुसार उभे आडवे बोर घेऊन विहिरी खोदून जाफराबाद भोकरदन आणि जालना तालुक्यातील काही भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
परतूर तालुक्यात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पामधून घनसावंगी परतुर आणि मंठा या तीन तालुक्यांना पाणीपुरवठा केला जाईल.
दरम्यान परतूर आणि मंठा या दोन्ही तालुक्यातील गावे निम्न दुधना प्रकल्पावरून घेतलेल्या पाण्यावरून वॉटर ग्रीड ने जोडलेले आहेत त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना पाणी टंचाईच्या झळा इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी बसतील. आणि तिसरा एक प्रकल्प आहे तो बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प .या प्रकल्पामधून बदनापूर आणि जालना येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेला जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा कार्यान्वित केला जाईल.
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन जंजाळ यांनी विविध प्रकल्पांना भेटी देऊन उपलब्ध पाणी साठ्याची पाहणी केली. अशाच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बातम्या पाहण्यासाठी लॉगिन करा https://www.edtvjalna.com

– दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *