![]()
जालना- भारतीय संविधानाच्या आधारे ज्यांनी जातीयवाद संपवायला पाहिजे होता तेच आज जातीयवाद वाढवत आहेत. त्यामुळे यापुढे जातीयवादाच्या रकान्यामध्ये जात न लिहिता गोत्र लिहिण्याचा नियम करावा. असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता एडवोकेट अश्विन उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे. कारण जाती पाहिल्या तर दहा हजार आहेत आणि गोत्र फक्त 125 आहेत आणि ते देखील सर्व समाजासाठी आहेत. तसेच विवाह हे जाती जातीमध्ये लावल्या जातात याउलट जर गोत्र असेल तर विवाह एकाच गोत्रात लावल्या जात नाही त्यामुळे निश्चितच दोन गोत्राचे घरे एकत्र येतील. असे झाले तर जातींची संख्या कमी होऊन समाजाला स्थैर्य लाभेल असेही ते म्हणाले. जालन्यात रामराज्य आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानाचे उद्घाटन उद्योगपती घनश्याम गोयल यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाला नगराध्यक्षा श्रीमती वंदना मगरे जालना पीपल्स कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष सतीश पंच आदींची उपस्थिती होती.
सध्याच्या परिस्थितीत माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात तरुण मुलांच्या जास्त आत्महत्या होत आहेत याला कारण म्हणजे आजचे कोचिंग क्लासेसच्या माफियांनी टाकलेले जाळे आहे. कारण प्रत्यक्ष शिक्षण आणि काम करतानाचे शिक्षण याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. केवळ कोचिंग च्या नावाखाली क्लास करायचा आणि प्रत्यक्ष काम करताना दुसरेच काम करावे लागत आहे त्यामुळे अनेक वेळा नैराश्य देखील येत आहे आणि त्यातूनच या आत्महत्या होत आहेत.
श्री अश्विनी उपाध्याय यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे गुन्हेगारीचा. व्यक्तींच्या आहाराचा संबंध हा त्याच्या व्यवहाराशी आहे. त्यामुळे ज्या समाजात शुद्ध आहार आहे तिथे गुन्हेगारी शून्य आहे असेही ते म्हणाले.

-दिलीप पोहनेरकर,942221972














Leave a Reply