बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

भारत मातेच्या चरणी जिल्हाधिकारी नतमस्तक

Loading

जालना- जालना तालुक्यातील नंदापूर येथे ह.भ.प डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या प्रेरणेतून भारत माता मंदिर साकारत आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच पार पडले. पंचक्रोशीतील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा सोहळा पार पडल्यानंतर इथे आता भक्तांची वर्दळ वाढली आहे. 

या मंदिरामुळे जिल्ह्याची निश्चितच मान उंचावणार आहे. तसेच नंदापूर या गावच्या विकासाला देखील हातभार लागणार आहे. त्यामुळे जालन्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी देखील या मंदिराला भेट देऊन पाहणी केली आणि मंदिर लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *