बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

पसंतीच्या वाहनासाठी पसंतीचाच नंबर पाहिजे? मग वाचा ही बातमी!

Loading

जालना -आपल्या पसंतीचे वाहन तर झाले आता नंबर ही आपल्याच पसंतीचा पाहिजे का? आणि तुमचे उत्तर हो असेल तर पुढील बातमी वाचा.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) बिगर परिवहन दुचाकी वाहनांच्या एमएच-21 सीक्यू या नवीन नोंदणी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे वाहन क्रमांक वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

या मालिकेतील एमएच-21 सीक्यू- 0001 ते 9999 (MH-21 CQ-001 to 9999) हे क्रमांक दि. 2 नोव्हेंबर 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पसंतीचा नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनाकर्षाद्वारे (डिमांड ड्राफ्ट) निर्धारित शुल्क, आधारकार्डाची स्वयंप्रमाणित छायांकित प्रत, पॅनकार्ड आणि भ्रमणध्वनी क्रमांकासह दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत.आकर्षक क्रमांकांचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येईल. अशा वेळी संबंधित अर्जदारांनी निर्धारित मूळ शुल्कासह वाढीव बोलीची रक्कम स्वतंत्र धनाकर्षाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित शुल्कापेक्षा सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक आरक्षित करून देण्यात येईल.

 


संबंधितांनी आपले धनाकर्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे बंद लिफाफ्यात दि. 3 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत.त्याच दिवशी दुपारी 3 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येणार असून, यावेळी सर्व संबंधित अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

– दिलीप पोहनेरकर,94222191722

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *