बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

… त्याप्रकरणी शासनाने अध्यादेश काढावा! -उबाठा सेनेच्या जिल्हाध्यक्षा रुपम घुगे.

Loading

जालना, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होरपळत असताना मायक्रो फायनान्स ची सक्तवसुली  थांबवावी, असे मत व्यक्त करत असतानाच शासनाने ही वसुली किती दिवस थांबवावी? त्या कर्मचाऱ्यांचे काय? कंपनीचे बुडणाऱ्या व्याजा विषयीचे काय? या सदर्भात स्पष्ट अध्यादेश काढावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रुपम घुगे यांनी केले आहे.

आज त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या. त्यामध्ये जनावरांना शेतकऱ्यांच्या बांधावर चारा पुरवठा करावा, सक्तीची वसुली करू नये, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आत्ताच सुरू झाले आहे त्याविषयी सविस्तर आराखडा तयार करून तो जनतेसमोर ठेवावा, तसेच धाराशिव चे आमदार कैलास पाटील यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी मागणी ही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेच्या वेळी काही महिलांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *